शेतक-यांचा जळगाव जिल्हा बँकेच्या संचालकांना इशारा
By Admin | Updated: May 15, 2017 16:28 IST2017-05-15T16:28:03+5:302017-05-15T16:28:03+5:30
जळगाव जिल्ह्यात शेतक-यांना कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतक-यांचा जळगाव जिल्हा बँकेच्या संचालकांना इशारा
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 15 - खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडून जळगाव जिल्ह्यात शेतक-यांना कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याच्या निषेथार्ध सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जळगाव जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले. शेतक-यांना तत्काळ कर्ज मिळाले नाही तर बँकेच्या संचालकांना बँकेत पाय ठेवू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिला. जळगाव जिल्हा बँकेत सध्या सर्व पक्षीय संचालक असून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे- खेवलकर या बँकेच्या अध्यक्ष आहेत.