वऱ्हाडाची मिनी बस उलटून २४ जखमी

By Admin | Updated: February 20, 2017 03:50 IST2017-02-20T03:50:01+5:302017-02-20T03:50:01+5:30

साकूर (ता. मालेगाव) येथून लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या मिनी बसला अपघात होऊन

Wardha's mini bus reversed and 24 injured | वऱ्हाडाची मिनी बस उलटून २४ जखमी

वऱ्हाडाची मिनी बस उलटून २४ जखमी

चाळीसगाव (जि. जळगाव) : साकूर (ता. मालेगाव) येथून लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या मिनी बसला अपघात होऊन त्यात २४ जण जखमी झाले आहेत. यातील ८ गंभीर जखमींना उपचारांसाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. रविवारी दुपारी देवळी -आडगावदरम्यान मालेगाव रस्त्यावर कोरडी नाल्याजवळ हा अपघात झाला.
वऱ्हाडाची मिनी बस साकूर येथे लग्न आटोपून निंभोऱ्याकडे परतताना चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट रस्त्याखाली उलटली. जखमींना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Wardha's mini bus reversed and 24 injured