प्रभाग निहाय सफाईचा मक्ता रद्दची शिफारस
By Admin | Updated: September 23, 2015 00:17 IST2015-09-23T00:17:25+5:302015-09-23T00:17:25+5:30
जळगाव : मनपाने वॉर्डनिहाय साफसफाईचा दिलेला मक्ता बंद करून एकमुस्तपद्धतीने मक्ता देण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागामार्फत प्रशासनाने महासभेपुढे आणला आहे.

प्रभाग निहाय सफाईचा मक्ता रद्दची शिफारस
जळगाव : मनपाने वॉर्डनिहाय साफसफाईचा दिलेला मक्ता बंद करून एकमुस्तपद्धतीने मक्ता देण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागामार्फत प्रशासनाने महासभेपुढे आणला आहे. मुख्य लेखापरीक्षकांनी वॉर्डनिहाय मक्ता तत्काळ रद्द करण्याची शिफारस केली आहे. तसेच आधी मनपाच्या कर्मचा:यांच्या साहाय्याने साफसफाई करण्याचा प्रय} करावा. आवश्यकता वाटली तरच मक्तेदाराकडून सफाई कर्मचारी घ्यावेत, असा शेरा मारला आहे. त्यामुळे मनपा महासभा याबाबत काय निर्णय घेते? याकडे लक्ष लागले आहे. ---------- प्रभाग निहाय मक्त्याने नुकसान मनपा प्रशासनाने एकमुस्त दरपद्धतीने दिलेला सफाईचा मक्ता रद्द करून प्रभागनिहाय मक्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 9 प्रभागांमध्ये मक्ता देण्यातही आला. त्यात दरमहा 3 लाख 40 हजार रुपये एका प्रभागात खर्च येत असल्याने 9 प्रभागांचा खर्चच महिन्याला 31 लाखांवर गेला आहे. जर 25 प्रभागांचा मक्ता दिला तर हा खर्च महिन्याला 85 लाखांवर जाईल. त्याऐवजी केवळ एकमुस्तपद्धतीने मक्ता देण्याची शिफारस केली आहे.