जामनेरात माणुसकीची भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:45 IST2019-08-16T22:44:54+5:302019-08-16T22:45:06+5:30
लोकार्पण : वस्तु देण्याचे आवाहन

जामनेरात माणुसकीची भिंत
जामनेर : मानवाने मानवासाठी काम करावे हीच खरी मानसिकता आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा साधना महाजन यांनी येथे केले. त्यांच्या हस्ते नगरपरिषदेतर्फे करण्यात आलेल्या माणुसकीच्या भिंतीचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्याधिकारी राहुल पाटील, उपनगर अध्यक्ष अनीस शेख, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, रिजवान शेख, नाजिम शेख, बांधकाम सभापती संध्या पाटील, शीतल सोनवणे, मंगला माळी, लिना पाटील, किरण पोळ, बाबुराराव हिवराळे, प्रा.शरद पाटील, उल्हास पाटील, आतिश झाल्टे, रमेश हिरे, दत्तू जोहरे आदी नगरसेवक कर्मचारी व नागरिके उपस्थित होते.कार्यक्रम पूर्वी संतोष सराफ व सहकारी यांनी पथनाट्य सादर केले. या उपक्रमाच्या माध्यमातून नगरपरिषदेने न्यू इंग्लिश स्कूल जवळ एक भिंत रंगवली असून ज्यांना गरज नसेल अशा वस्तू व कपडे आणून ठेवव्या व ज्यांना गरज असेल ते या वस्तू घेवून जातील असा हा उपक्रम आहे. यासाठी वापरात न येणाऱ्या वस्तू इतरांना वापरता याव्या म्हणून नागरिकांनी या ठिकाण आणून दातृत्वाचे काम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.