शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, जळगाव जिल्ह्यात पहिली आणि आठवची पाठ्यपुस्तके दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:50 IST

शुक्रवार पासून वितरण सुरु

ठळक मुद्देउर्दू आणि सेमी इंग्रजी माध्यमही उपलब्धपाठ्यपुस्तके स्मार्टफोनवरही उपलब्ध

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि. जळगाव : शाळा प्रवेशोत्सवाची सुरुवातच १५ जून रोजी नव्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करुन झाली होती. मात्र यंदा इयत्ता पहिली आणि आठवीचा पाठ्यक्रम बदलल्याने ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी उपलब्ध होऊ शकली नव्हती. तेरा दिवसांनी म्हणजेच बुधवारी जिल्ह्यात दाखल झाली असून शुक्रवारपासून त्याचे वितरण तालुकास्तरावरुन गटशिक्षण कार्यालयाकडून सुरु झाले आहे.सर्व शिक्षा अभियानर्तंत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या पुस्तकांच्या संचाचे वितरण केले जाते. यंदाही दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली गेली.पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम बदलल्याने ही पाठ्यपुस्तके उशिरा दाखल झाली आहे.उर्दू आणि सेमी इंग्रजी अभ्यासक्रमाचीदेखील पुस्तके उपलब्ध झाली आहेत. शाळांना पुस्तके घेऊन जाण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.चाळीसगाव तालुक्यात १४ हजार विद्यार्थीचाळीसगाव तालुक्यात पहिली आणि आठवीच्या १४ हजार ६५६ विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत. इयत्ता पहिलीतील उर्दू माध्यमातील २९१ आणि मराठीसह सेमी इंग्रजी माध्यमातील सहा हजार २९१ तर आठवीच्या उर्दू माध्यमातील ३८५ तसेच मराठीसह सेमी इंग्रजीच्या सात हजार २८२ अशा सात हजार ६६७ विद्यार्थ्यांना येत्या दोन ते तीन दिवसात पाठ्यपुस्तके मिळतील.स्मार्ट फोनवरही पुस्तके उपलब्धयावर्षी प्रथमच बालभारतीने डिजिटल टेक्नोव्ह?सी पर्याय देखील उपलब्ध करुन दिल्याने स्मार्ट फोनवरही पाठ्यपुस्तके पाहता येऊ शकतात. यासाठी ‘दिक्षा’ अ‍ॅपची निर्मिती केली गेली आहे. पाठ्यपुस्तकाच्या प्रत्येक पानावर याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या पृष्ठावरील क्यु.आर.कोड व्दारे डिजिटल पाठ्यपुस्तक तसेच पाठ्यपुस्तकातील आशयाच्या अनुषंगाने अन्य अध्ययन - अध्यापनसाठी उपयुक्त दृक-श्राव्य साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांसह पालकांनाही होणार आहे.पहिली व आठवीची उर्दूसह मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाची पाठ्यपुस्तके तीन दिवसांपूर्वी उपलब्ध झाली आहेत.  एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही. याची खबरदारी घेतली आहे.- सचिन परदेशी, गटशिक्षणाधिकारी, चाळीसगाव.

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगाव