आठवडाभरात होणार ट्रॅव्हल्स थांबा

By Admin | Updated: September 30, 2015 00:21 IST2015-09-30T00:21:17+5:302015-09-30T00:21:17+5:30

जळगाव : गेल्या दीड महिन्यापसून सुरू असलेल्या ट्रॅव्हल्स थांब्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Wait a week to travel | आठवडाभरात होणार ट्रॅव्हल्स थांबा

आठवडाभरात होणार ट्रॅव्हल्स थांबा

जळगाव : गेल्या दीड महिन्यापसून सुरू असलेल्या ट्रॅव्हल्स थांब्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. नेरी नाक्याजवळ असलेल्या विठ्ठल मंदिर संस्थानच्या जागेवर झुडपे तोडून सपाटीकरण पूर्ण झाले आहे. आठवडभरात या जागेवरच ट्रॅव्हल्स थांबविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी ट्रॅव्हल्स मालकांना दिल्या. मंगळवारी डॉ.सुपेकर यांनी या जागेची पाहणी केली.अकरा महिन्याच्या कराराने ही जागा घेण्यात आली आहे

विद्युत खांब हटविणार

या जागेवर विद्युत खांबचा अडथळा निर्माण झाला आहे. महावितरणच्या अधिका:यांशी बोलून हे खांब तातडीने इतरत्र हलविण्यात येणार आहे.

मनपातर्फे लाईटची सुविधा पुरविली जाणार आहे. प्रवाशांसाठी स्वतंत्र शेड तसेच शौचालय व मुतारीचीही सोय केली जाणार आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेता आवश्यक त्या सुविधा येथे उभारल्या जाणार आहेत. वॉलकंपाऊंडचेही नियोजन करण्यात आले आहे. नेरी नाका हा परिसर शहराच्या बाहेर व सर्वच ठिकाणच्या प्रवाशांना सोयीचा ठरणार आहे. नवीन रिक्षा स्टॉप सुरू करण्याबाबतही त्यांनी सरोदे यांना सूचना केल्या.

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

चार -पाच दिवसात प्रत्यक्ष थांबा सुरू होणार आहे. अत्याधुनिक सुविधा उभारण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. सर्व सुविधायुक्त थांबा कार्यान्वित झाल्यावर पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत थांब्याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे डॉ.सुपेकर यांनी सांगितले. पाहणीच्या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकात सरोदे, प्रमोद झांबरे, सुनील कोल्हे, दिलीप माहेश्वरी विठ्ठल मंदिर संस्थानचे सदस्य विलास चौधरी यांच्यासह 25 जण यावेळी उपस्थित होते.

 

Web Title: Wait a week to travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.