जिल्हा कार्याध्यक्षपदी व्याहीळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST2021-08-12T04:19:53+5:302021-08-12T04:19:53+5:30

जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी भिका धुडकू व्याहीळे यांची निवड करण्यात आली आहे. ही ...

Vyahile as the District Executive | जिल्हा कार्याध्यक्षपदी व्याहीळे

जिल्हा कार्याध्यक्षपदी व्याहीळे

जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी भिका धुडकू व्याहीळे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे व जिल्हाध्यक्ष दीपक सपकाळे यांनी केली असून नुकतेच व्याहीळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. निवडीबद्दल यशवंत बैसाणे, अंबादास सोनवणे, शांताराम अहिरे, गुलाबराव भदाणे, रत्नाकर जोहरे, हर्षल पाटील, भीमराव सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

०००००००००००००

०८ सीटीआर १५हर्षल पाटील यांची निवड

जळगाव : हर्षल सोपान पाटील यांची ओबीसी आघाडी महानगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे व जिल्हाध्यक्ष दीपक सपकाळे यांनी केली आहे. निवडीबद्दल यशवंत बैसाणे, भिका व्याहीळे, शांताराम अहिरे, गुलाबराव भदाणे, रत्नाकर जोहरे, अंबादास सोनवणे, भीमराव सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

०००००००००००

०८ सीटीआर १४

अपंग आघाडी महानगराध्यक्षपदी सोनवणे

जळगाव : अंबादास पिंताबर सोनवणे यांची अपंग आघाडी महानगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे व जिल्हाध्यक्ष दीपक सपकाळे यांनी केली आहे. नुकतेच सोनवणे यांना नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे.

Web Title: Vyahile as the District Executive