शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

खान्देशातील २० पैकी १६ मतदारसंघात मतदानात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:15 PM

४ मतदारसंघात वाढला टक्का : सर्वाधिक १०.०३ टक्के घट जळगाव मतदारसंघात

जळगाव : विधानसभा निवडणुकीत खान्देशातील २० मतदार संघांपैकी तब्बल १६ मतदार संघांमध्ये गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत घट झाली आहे. तर ४ मतदार संघात मतदानाचा टक्का वाढला आहे. सर्वात कमी ४५.१३ टक्के मतदान जळगाव शहर मतदार संघात झाले आहे. तर सर्वाधिक ७५.३७ टक्के मतदान नवापूर मतदार संघात झाले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी मतदाना २१ रोजी पार पडले. मात्र यंदा गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसून आले.मतदारांनी मतदानाकडे पाठ का फिरविली? असा प्रश्न यामुळे प्रशासन व राजकारण्यांसमोर उपस्थित झाला आहे.जळगाव जिल्ह्यात ६०.९० टक्के मतदानजळगाव जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६४.२८ टक्के मतदान झाले होते. मात्र यंदा एकूण ६०.९० टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातच एकूण मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे. त्यात जळगाव शहरात सर्वात कमी ४५.१३ टक्केच मतदान झाले आहे.शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, खोदकामामुळे पडून असलेल्या मातीचा पावसामुळे झालेला चिखल यामुळे मतदारांनी घराबाहेर पडण्याचा कंटाळा केल्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. तर मतदार स्लिपचे वाटप पूर्णपणे न झाल्याचा फटकाही बसल्याचे मानले जात आहे.सर्वाधिक ६८.७२ टक्के मतदान रावेर मतदार संघात झाले आहे. त्यामुळे कमी मतदानाचा व जास्त मतदानाचा फटका विद्यमान आमदारांना बसणार का? अशी चर्चाही सुरू झाली आहे.नंदुरबार जिल्ह्यात वाढली मतदानाची टक्केवारी४नंदुरबार वगळता सर्वच मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. नंदुरबार मतदारसंघात गेल्या पंचवार्षीकला ६१.६७ टक्के मतदान झाले होते. यावेळी केवळ ५५.२८ टक्के मतदान झाले. नवापूर मतदारसंघात सर्वात जास्त ७५.३७ टक्के मतदान झाले येथे देखील वाढ झाली आहे. अक्कलकुवा मतदारसंघात एक टक्का मतदान वाढले आहे. तर शहादा मतदारसंघात अवघे ०.१५ टक्के मतदान वाढले आहे. जिल्ह्यात एकुण ६६.३७ टक्के मतदान झाले.४जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर येथे गत विधानसभेपेक्षा कमी मतदान झाले असले तरी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या तुलनेत अधिक मतदान झाले आहे.धुळ्यात सर्वात कमी मतदाननंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार मतदार संघात सर्वात कमी ५५.२८ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वाधिक ७५.३७ टक्के मतदान नवापूर मतदार संघात झाले आहे. तर धुळे जिल्ह्यात धुळे शहर मतदारसंघात सर्वात कमी ४९.८३ टक्के तर शिरपूर मतदार संघात ६५.७९ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक १०.५५ टक्के घट साक्री तालुक्यात झाली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव