३ लाख मतदारांना 'व्होटर्स स्लीप'
By Admin | Updated: October 7, 2014 15:05 IST2014-10-07T15:05:33+5:302014-10-07T15:05:33+5:30
विधानसभा निवडणुकी साठी १५ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. शहर विधानसभा मतदारसंघा तील सर्व मतदारांना व्होटर्स स्लीपचे वितरण करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले.

३ लाख मतदारांना 'व्होटर्स स्लीप'
जळगाव : विधानसभा निवडणुकी साठी १५ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. शहर विधानसभा मतदारसंघा तील सर्व मतदारांना व्होटर्स स्लीपचे वितरण करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले असून बुधवारी सकाळी आठ वाजेपासून मतदान यंत्राचे सील करण्यात येणार आहे.
३८२ केंद्रस्तरीय अधिकारी शहरात ३८२ केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. त्यांना ७00 ते १२00 मतदारांना चिठ्ठी पोहचविण्याचे काम सोपविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी काही मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठय़ा न पोहचल्याने नाराजी व्यक्त होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कर्मचारी संख्या वाढविणे आवश्यक आहे.
आज मतदान यंत्र सील होणार
नूतन मराठा महाविद्यालयातील सभागृहात आज मतदान यंत्र सील करण्यात येणार आहेत. उमेदवारांच्या नावांची यादी यंत्रात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत टाकण्यात येतील व यंत्र सील करण्यात येणार आहे. ४२५ कंट्रोल युनीट व ८५0 बॅलेट युनीट बंदीस्त करण्यात येणार आहेत.
११ पर्यंत घरोघरी वितरण होणार
व्होटर्स स्लीपचे वितरण शहरात ११ ऑक्टोबरपर्यंत घरपोच करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ रोजी प्रत्येक केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी बसणार असून ते मतदारांना वितरित करणार आहे.