जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक केली मतदार नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:17 IST2021-04-01T04:17:19+5:302021-04-01T04:17:19+5:30
जळगाव : जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा यांनी जळगाव शहर ...

जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक केली मतदार नोंदणी
जळगाव : जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत आणि त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा यांनी जळगाव शहर मतदार संघात मतदार नोंदणी केली आहे. त्यांना निवडणूक ओळखपत्राचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले. जिल्हा निवडणूक अधिकारी पदाचे कर्तव्य बजावत असतांना मतदार म्हणून कर्तव्य बजावणेसाठी मतदार नोंदणी करुन घेतल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. तसेच वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तसेच अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या नागरिकांनी त्वरित मतदार नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी याप्रसंगी केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी अनुराधा यांनी मतदार नोंदणीत स्त्रियांनी देखील पुढे यावे आणि मतदार म्हणून नोंदणी करुन घेण्याचे आवाहन केले.
जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार स्त्री- पुरुष प्रमाण ९२२ असून मतदार यादीनुसार स्त्री-पुरुष प्रमाण ९२१ इतके आहे. ही तफावत भरुन काढण्यासाठी अद्याप ज्या महिलांनी मतदार नोंदणी केलेली नाही त्यांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले आहे.