विविध समस्यांवर कुलगुरूंची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST2021-05-06T04:17:25+5:302021-05-06T04:17:25+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या तसेच विविध वर्गांच्या ऑनलाइन परीक्षा, ...

विविध समस्यांवर कुलगुरूंची घेतली भेट
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या तसेच विविध वर्गांच्या ऑनलाइन परीक्षा, प्राध्यापक आणि कर्मचारीवर्गांच्या आदी समस्यांसंदर्भात सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी बुधवारी प्रभारी कुलगुरू डॉ.ई.वायुनंदन यांची भेट घेतली. यावेळी युवासेना अंकित कासार, शैलेश काळे व राजेश वारके आदी उपस्थित होते.
==========
सफाई कामगारांना मास्कवाटप
जळगाव : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतही आपल्या जीवाला धोक्यात ठेवून सफाई कामाची भूमिका पार पाडणाऱ्या सफाई कामगारांना निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित कोरोना विषाणूपासून आपले संरक्षण करण्यासाठी मास्क व हँडग्लोजवाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश जावळे, धीरज जावळे, राकेश मुंडले, नकुल सोनवणे, सतीश जावळे, रोशन मुंडले, धनंजय सोनवणे, हर्षदा पाटील, शारदा सोनवणे, चेतन चौधरी उपस्थित होते.
=============
अदनान शेख यांचे यश
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नुकताच दीक्षान्त समारंभ पार पडला. अदनान अहमद शेख याने बीए इतिहास विषयात सुवर्णपदक पटकाविल्याने त्याचा समारंभात सुवर्णपदकाने सन्मान करण्यात आला. त्याचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
==============
''मामाचं'' आंदोलन म्हणजेच जनतेची थट्टा...
जळगाव : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व आमदार सुरेश भोळे यांनी शहराच्या चौकामध्ये येऊन कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पश्चिम तृणमूल येथील काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन केले. परंतु, मामांचं हे आंदोलन दुर्दैवी जळगावकरांची एक प्रकारची थट्टाच असल्याची टीका जिल्हा एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे. आमदार म्हणून शहराची संपूर्ण जबाबदारी ही त्यांनी झटकून टाकलेली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.