शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोवरील विषाणूचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 11:49 IST

अफवांचा बाजार गरम : शेतकऱ्यांसह नागरिकांनी घाबरू नये

जळगाव : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर टोमॅटोवर कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचा अफवा पसरविल्या जात आहेत. तसेच या व्हायरसचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचेही सांगितले जात आहे. सोशल मीडियावरील हे संदेश केवळ अफवा असून, या विषाणूंचा कोणताही प्रादुर्भाव मानवी आरोग्यावर होत नाही. या केवळ अफवा असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ प्रा.किरण जाधव यांनी म्हटले आहे.बंगळूरु येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतंर्गत भारतीय बागवानी अनुसंधान केंद्राने महाराष्टÑातील फलटण, अकोला व इतर भागातून टॉमेटोचे नमुने घेतले होते.नमुन्यांची तपासणीअंती या टोमॅटोवर कुकुंबर मोझॅक, टोबॅको मोझॅक, ब्रक्ट नेक्रॉसीस व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या व्हायरसमुळे असमान पक्वता, रंग पिवळसर पडणे, फळात पोकळपणा, रसविरहीत फळ तयार होणे अस लक्षणे तयार होत असतात. मात्र, व्हायरसबाबत सोशल मीडियावरील अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. विषाणूयुक्त फळ खाल्ल्याने मानवी आरोग्य धोक्यात येते असे म्हटले जात आहे. मात्र, या केवळ अफवा असून, हे विषाणू केवळ वनस्पतीवर येणारे आहेत. याचा कधिही मानवी आरोग्याला धोका राहत नाही असेही प्रा.किरण जाधव यांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.टरबूज कारपेट किंवा इंजेक्शन देऊन पिकवले जात नाहीटोमॅटोप्रमाणेच टरबूजबाबतदेखील अफवा पसरविल्या जात आहे. नागपूर येथे टरबूज फुटल्यामुळे अफवांचा बाजार जोरात आहे. उन्हाळ्यात टरबूजच्या गराचे तापमान वाढलेले असते व पक्वतेच्या पुढे काही वायू फळांमध्ये तयार होत असतात. यामुळेत्या फळातील गर बाहेर पडत असते. टरबूज हे फळ कारपेट किंवा इंजेक्शन विनाच पिकत असते. त्यामुळे हे फळ आरोग्यदायी आहे. त्यामुळे या फळाबाबतही अफवा पसरविल्या जात आहे. या अफवांमुळे शेतकऱ्यांचेच नुकसान अधिक होत असल्याचे प्रा.किरण जाधव यांनी म्हटले आहे.टोमॅटोवर विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला याबाबतचे काही संदेश व्हायरल होत आहेत. मात्र,त्या अफवाच आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या आवकवर कोणताही परिणाम झालेला नाही.-कैलास चौधरी, सभापती, बाजार समिती, जळगावटोमॅटोवर विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला असला तरी त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत नाही, हे बंगळूरु येथील संस्थेनेही जाहीर केले आहे. मात्र, अफवांमुळे नागरिकांमध्ये ती भीती असल्याने टोमॅटो लागवडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.-नीलेश ईश्वर पाटील, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव