शासन आदेशाचे उल्लंघन; मोर्चेकरांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:18+5:302021-07-21T04:13:18+5:30

जळगाव : आदिवासी भिल्ल समाजाची दफनभूमी सातबारा उताऱ्यावर नावे लावून द्यावी या मागणीसाठी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी ...

Violation of government order; Filed a case against the Morchekars | शासन आदेशाचे उल्लंघन; मोर्चेकरांविरुद्ध गुन्हा दाखल

शासन आदेशाचे उल्लंघन; मोर्चेकरांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : आदिवासी भिल्ल समाजाची दफनभूमी सातबारा उताऱ्यावर नावे लावून द्यावी या मागणीसाठी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी जी.एस. ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून शासन आदेशाचे उल्लंघन केले म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय नामदेव गायकवाड, कार्याध्यक्ष सूर्यकांत पवार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल सोनवणे, उपाध्यक्ष रवी मोरे, अक्षय मालचे, विशाल मोरे, देवीदास बहिरम, विजय ठाकरे, राजू सोनवणे व मोतीलाल सोनवणे यांच्यासह इतर ३०० ते ४०० जणांविरुद्ध भादंवि कलम १८८, २६९,२७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा २०२५ चे कलम ५१ ब व साथरोग अधिनियम २, ३, ४, तसेच मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१), ३७ (३) ल १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कर्मचारी उमेश दंगलराव पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. तपास विजयकुमार सोनार करीत आहेत.

Web Title: Violation of government order; Filed a case against the Morchekars