वाळू चोरट्यांकडून तलाठ्याला मारहाण

By Admin | Updated: January 4, 2017 00:52 IST2017-01-04T00:52:14+5:302017-01-04T00:52:14+5:30

अमळनेर : चोरटी वाळू नेणाºया ट्रॅक्टरमालकाला हटकल्याचा राग आल्याने त्याने तलाठ्याला दांडक्याने मारहाण

The villain by the thief | वाळू चोरट्यांकडून तलाठ्याला मारहाण

वाळू चोरट्यांकडून तलाठ्याला मारहाण

अमळनेर : चोरटी वाळू नेणाºया ट्रॅक्टरमालकाला हटकल्याचा राग आल्याने त्याने तलाठ्याला दांडक्याने मारहाण करून ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना २ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता मांडळ येथे पांझरा नदीत घडली.
तलाठी प्रवीण सुकदेव सोनवणे (३९) व कोतवाल चंद्रकांत भिल हे गौणखनिज प्रतिबंधक कर्तव्य व शासकीय वसुली करीत होते. मांडळ येथे पांझरा नदी पात्रात २ रोजी सायंकाळी ५.१० वाजता विजय विनायक पाटील (रा.कंचनपूर, ता.शिंदखेडा, जि.धुळे) हे त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर (एमएच-१८-एन-३५९) मध्ये सव्वा ब्रास वाळू चारून नेत होते.
विजय पाटील यास  परवान्याबाबत जाब विचारला असता त्यांनी शिवीगाळ करून पावडीच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांनी ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेत, जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली.
याप्रकरणी तलाठी प्रवीण सोनवणे यांनी फिर्याद दिल्यावरून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार भीमराव भोई करीत आहे.
    (वार्ताहर)

Web Title: The villain by the thief