तापी नदीच्या पात्रात वाहून जाणाऱ्या हरणास गावकऱ्यांनी वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:21 IST2020-07-19T16:21:08+5:302020-07-19T16:21:54+5:30
बुधगाव येथील घटना

तापी नदीच्या पात्रात वाहून जाणाऱ्या हरणास गावकऱ्यांनी वाचविले
चोपडा : तालुक्यातील बुधगाव येथे तापी नदीच्या पात्रात एक हरीण वाहुन जात असताना गावातील तरुण जितेंद्र कोळी, सागर धनगर, संजू भोई यांनी नदीच्या पात्रात उडी घेऊन त्यास वाचवले. ही घटना रविवारी घडली. हरणाच्या पोटातील पाणी काढण्यासाठी हातेड येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात डॉ. जगताप यांच्याकडे घेऊन जात हरणावर उपचार केले.यानंतर लगेचच बुधगाव येथील शिवसेना शाखाप्रमुख भरत धनगर यांनी वनरक्षक कर्मचारी गोपाल पाटील यांना याबाबत कळविले.