कुसुंबे खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:37+5:302021-05-05T04:27:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फेब्रुवारी महिन्यात ग्रामविकास अधिकारी शरद सूर्यवंशी यांची बदली होऊन सुद्धा अद्याप त्यांनी दफ्तर नवीन ...

कुसुंबे खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फेब्रुवारी महिन्यात ग्रामविकास अधिकारी शरद सूर्यवंशी यांची बदली होऊन सुद्धा अद्याप त्यांनी दफ्तर नवीन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे सोपविलेले नाही. त्या विरोधात कुसुंबे खुर्द गावातील काही ग्रामस्थ व सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन मंगळवारी दुपारी ३.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
जळगाव तालुक्यातील कुसुंबे खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी म्हणून शरद सूर्यवंशी कार्यरत होते. मात्र, त्यांची फेब्रुवारी महिन्यात त्यांची बदली झाली. त्यामुळे त्यांच्या जागी ग्रामविकास अधिकारी म्हणून पी. एल. मोरे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. अखेर या प्रकाराला कंटाळून कुसुंबे खुर्द गावातील काही ग्रामस्थांसह सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी सरपंच इंदूबाई दगडू पाटील, उपसरपंच विलास कोळी, सदस्य भूषण पाटील, संगीता पाटील, पल्लवी चौधरी, रामदास कोळी, विशाल राणे, राहुल सोनवणे, यमुनाबाई ठाकरे, समाबाई तडवी, यासिन तडवी, मीनाबाई पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट
शरद सूर्यवंशी यांचे दफ्तर लिहायचे राहिले असतील, देतील ते लवकरचं. मात्र, दफ्तर न मिळाल्यामुळे पुढील कामकाज करता येत नाही.
- पी. एल. मोरे, ग्रामविकास अधिकारी, कुसुंबे खुर्द