गावात आम्हाला धमक्या दिल्या जातात, दुसरीकडे पुनर्वसन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:21 IST2021-02-27T04:21:18+5:302021-02-27T04:21:18+5:30
जळगाव : आमच्या कुटुंबातील एका मुलीने गावातील काही जणांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली व त्या विरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रार ...

गावात आम्हाला धमक्या दिल्या जातात, दुसरीकडे पुनर्वसन करा
जळगाव : आमच्या कुटुंबातील एका मुलीने गावातील काही जणांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली व त्या विरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रार केली म्हणून आम्हाला गावात धमक्या दिल्या जात आहे, आमचे दुसरीकडे पुनर्वसन करा, अशी मागणी टोळी, ता. पारोळा येथील पीडीतेच्या कुुटंबीयांनी राष्ट्रीय अनुसुचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी व पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे पीडीतेच्या कुटुंबीयांनी केली. या वेळी हात जोडून या सदस्यांनी विनवण्या केल्या.
टोळी, ता.पारोळा येथे एका मुलीने गावातील काही जणांच्या जाचास कंटाळून १० नोव्हेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर सदर मुलीच्या कुुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्याने या कुटुंबीयांनी शुक्रवारी सुभाष पारधी यांची भेट घेत तक्रार केली.
तपासाधिकारी धमकी देतात
या प्रकरणात तपासाधिकारी आम्हाला धमकी देत असल्याची माहिती पीडीतेच्या कुटुंबीयांनी पारधी यांना दिली. इतकेच नव्हे या विषयी तक्रार दिल्यानंतर केवळ एनसी दाखल केल्याचेही कैफियत मांडण्यात आली.
पोलीस अधीक्षकांना सूचना
टोळी, ता.पारोळा येथील या प्रकरणात पोलिसांकडून चालढकल केली जात असल्याची तक्रार पीडितेच्या कुटुंबीयांनी सुभाष पारधी यांच्याकडे केली. त्या वेळी पारधी यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना बोलावून घेत या प्रकरणात आपण स्वत: लक्ष द्या, अशा सूचना दिल्या. त्या वेळी कुुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांपुढेही हात जोडून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
बैठकीत अधिकाऱ्यांनी सूचना
या भेटीपूर्वी पारधी यांनी अजिंठा विश्रामगृह येथे बैठक घेऊन आढावा घेतला. यात जिल्ह्यातील घटनांची माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अनुसुचीत आयोग कार्यालयाच्या सहाययक निदेशक आनुराधा दुसाने (पुणे), समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील आदी उपस्थित होते.