जैतपीर येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:45+5:302021-06-22T04:11:45+5:30
अमळनेर : तालुक्यातील जैतपीर येथे मारवड पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून २० हजार रुपयांचे कच्चे रसायन, ...

जैतपीर येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त
अमळनेर : तालुक्यातील जैतपीर येथे मारवड पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून २० हजार रुपयांचे कच्चे रसायन, दारूसह साहित्य नष्ट केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला, हेड कॉन्स्टेबल भास्कर चव्हाण, फिरोज बागवान, संजय पाटील, सुनील तेली यांनी २० रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील जैतपीर येथे मोंढा नाल्याच्या शेजारी काटेरी झुडपात छापा टाकला असता संतोष हिरामण कोळी हा गावठी हातभट्टीची दारू गाळत असताना आढळला. पोलिसांच्या पथकाने हातभट्टी उद्ध्वस्त केली आणि १९ हजार २५० रुपयांचे कच्चे रसायन , दारू, गूळ नवसागर मिश्रित रसायन नष्ट केले. आरोपी संतोष कोळी फरार झाला आहे. मारवड पोलीस स्टेशनला संतोषविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत.