न्यू अचानक मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी विकास सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:20 IST2021-09-09T04:20:40+5:302021-09-09T04:20:40+5:30

जळगाव : महाराष्ट्रातील सर्वात मोठा असणारा गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वचजण गणपतीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत ...

Vikas Sonawane as the chairman of the New Sudden Friends Circle | न्यू अचानक मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी विकास सोनवणे

न्यू अचानक मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी विकास सोनवणे

जळगाव : महाराष्ट्रातील सर्वात मोठा असणारा गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वचजण गणपतीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती बाप्पा सर्वांचे आवडते दैवत आहे. अशात गणेश मंडळांची कार्यकारिणीसुध्दा जाहीर झाली आहे.

आसोदा रस्त्यावरील वाल्मीक नगरातील न्यू अचानक मित्र मंडळाचे यंदा ४० वे वर्ष आहे. नुकतीच मंडळाची कार्यकारिणी जाहीर झाली असून, मंडळाच्या अध्यक्षपदी विकास सोनवणे, तर उपाध्यक्ष म्हणून भूषण शिंपी यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदार दशरथ सपकाळे, सचिव म्हणून सागर बाविस्कर यांची निवड झाली आहे. तर सदस्यांमध्ये ज्ञानेश्वर कोळी, योगेश सपकाळे, भूषण सोनवणे, विक्की सपकाळे, गणेश साळुंखे, दीपक कोळी, संदीप सोनवणे, मनीष इंगळे, शरद इंगळे, चंदू कोळी, जितू सोनवणे आदींचा समावेश आहे. दरवर्षी मंडळाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. गेल्या दोन वर्षांपासून अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला जात होता. यंदा सार्वजनिक गणशोत्सव महामंडळाच्या सूचनेनुसार रोजगार उत्सव राबविणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष भूषण शिंपी यांनी दिली.

Web Title: Vikas Sonawane as the chairman of the New Sudden Friends Circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.