शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोदयच्या अध्यक्षपदी विकास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 18:12 IST

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पंडितराव पाटील यांची तर सचिवपदी उदेसिंग मोहन पाटील यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देसचिवपदी उदेसिंग पाटील : निवड प्रक्रिया बिनविरोध.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : सर्वोदय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पंडितराव पाटील यांची तर सचिवपदी उदेसिंग मोहन पाटील यांच्यासह उपाध्यक्षपदी प्रशांत मुरलीधर पाटील, सहसचिवपदी सुरेश श्रीपतराव सोनवणे यांची सोमवारी सायंकाळी ५ वाजता नुतन संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

गिरणा खोऱ्यातील शिक्षण गंगोत्री अशी ओळख असणाऱ्या सर्वोदयची निवडणुक प्रक्रिया दोन मे रोजी पार पडली. तीन रोजी निकाल जाहिर झाले. विद्यमान सत्ताधाऱ्यानाच मतदारांनी कौल देतांना विरोधकांचा धुव्वा उडवला होता. रामराव जिभाऊ पाटील व उदेसिंह पवार स्मृती पॕनलने पूर्ण १९ जागा जिंकत संस्थेवरील आपले वर्चस्व घट्ट केले आहे. अध्यक्ष आणि सचिव यांना पुन्हा संधी मिळाली आहे. उपाध्यक्ष व सहसचिवपदासाठी नव्या - जुन्यांचा मेळ साधण्यात आला आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संचालकांनी आनंद व्यक्त केला. नवनियुक्त पदाधिका-यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. निवडीच्यावेळी नरसिंग हाटेसिंग पाटील, संजय संतोष पाटील, भगवान अमरसिंग पाटील, आनंदा फकिरा पाटील, भाऊसाहेब भिकनराव जगताप, इंद्रसिंग उदेसिंग पवार, उमेश प्रकाश करपे, प्रविण भिकन पाटील, राजेंद्र महारु पाटील, योगेश नीळकंठ भोकरे, अशोक परमेश्वर चौधरी, नेताजी कैलास हिरे, वर्षा नाना कोळी, अनिता नितिन पाटील, साधना शामकांत निकम आदी नुतन संचालक उपस्थित होते.

नव्या-जुन्यांचा साधला मेळ

अध्यक्ष व सचिवपदी अनुक्रमे विकास पाटील, उदेसिंग पाटील यांची फेरनिवड झाली आहे. उदेसिंह पवार यांच्या निधनानंतर विकास पाटील यांची २०१९मध्ये अध्यक्षपदी निवड केली गेली. सचिवपदी निवड झालेले उदेसिंग पाटील यांचीही प्रकाश पाटील यांच्या निधनानंतर याच पदावर निवड झाली होती.

उपाध्यक्षपदी निवड झालेले प्रशांत मुरलीधर पाटील हे गत संचालक मंडळात पहिल्यांदा निवडून आले. ते रामराव जिभाऊ पाटील यांच्या कुटूंबातील असून त्यांच्यासाठी ज्येष्ठ संचालक नरसिंग हाटेसिंग पाटील यांनी माघार घेत त्यांच्या निवडीची वाट सुकर केली. प्रशांत पाटील हे राष्ट्रीय सह. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व चाळीसगाव महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. एम.बी.पाटील यांचे सुपूत्र आहे.

भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष आणि संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुरेश श्रीपतराव सोनवणे यांच्या गळ्यात सहसचिवपदाची माळ पडली.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावEducationशिक्षणElectionनिवडणूक