शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

विजय चौधरीच ठरला हिरो

By admin | Published: March 18, 2017 12:51 AM

खेळाडूंचा गौरव : उमवित जिमखाना डे उत्साहात

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आयोजित केलेला जिमखाना डे शुक्रवारी दुपारी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात साजरा करण्यात आला. यासोहळ््याचा खरा हिरो ठरला तो  सलग तीनवेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा चाळीसगावचा मल्ल विजय चौधरी. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील गुणवान खेळाडूंना विजय चौधरी याच्या हस्ते गौरवण्यात आले. २०१५-१६ चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पारोळ्याच्या अरविंद जावळे तर २०१६-१७ या वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून फैजपूरच्या उमेश कोळी यांचा गौरव करण्यात आला. या वेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.ए.बी. चौधरी, रसायनशास्त्र विभागाचे संचालक डॉ.पी.पी. माहुलीकर, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते.  या कार्यक्रमात २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन्ही शैक्षणिक वर्षातील खेळाडूंना गौरवण्यात आले.२०१५-१६ या वर्षात प्रथम क्रमांक नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव, व्दितीय  एस.एस.व्ही.पी.एस. कला व  वाणिज्य महाविद्यालय, धुळे, तृतीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर, चौथा  क्रमांक एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर, पाचवे पूज्य साने गुरुजी विद्या         प्रसारक संस्थेचे महाविद्यालय, शहादा, सहावा क्रमांक एम.डी. पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे, सातवा  बी.पी.कला, वाणिज्य व    विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव, आठवा क्रमांक र.ना.देशमुख महाविद्यालय, भडगाव,  नववा क्रमांक बांभोरीच्या एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकावला. २०१६-१७ मध्ये  उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रथम दहा महाविद्यालये पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक - एस.एस.व्ही.पी.एस. कला व वाणिज्य महाविद्यालयाने पटकावला. , व्दितीय क्रमांक - नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव  तृतीय क्रमांक - कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर, चौथा क्रमांक- उत्तमराव पाटील महाविद्यालय, दहीवेल, पाचवा क्रमांक  पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक संस्थेचे महाविद्यालय, शहादा,  सहावा क्रमांक श्रमसाधना संस्थेचे अभियांत्रिकी  महाविद्यालय, बांभोरी, सातवा                क्रमांक  सौ.र.ना.देशमुख महाविद्यालय, भडगाव, आठवा   क्रमांक एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर,   नववा क्रमांक धुळ्याच्या एम.डी. पालेशा वाणिज्य  महाविद्यालयाने पटकावला.  तर एकलव्य शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. उमेश कोळी, अरविंद जावळे सर्वोत्कृष्ट२०१५-१६ या वर्षात झालेल्या आंतर विद्यापीठ अखिल भारतीय स्पर्धेत उमविला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्याला या वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.तर २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात आंतरविद्यापीठ अखिल भारतीय स्पर्धेत भारोत्तोलनात रौप्यपदक पटकावले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. बेंडाळे महाविद्यालय  सलग सातवेळा विजेतेजळगावच्या डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाने सलग सातव्यांदा महिला गटातील सर्वोत्तम महाविद्यालयाचा पुरस्कार पटकावला.