मुनीश्री उदीतकुमारजी ठाणा ६ यांचा जळगाव येथून विहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST2021-01-18T04:14:44+5:302021-01-18T04:14:44+5:30

जळगाव : आचार्य श्री महाश्रमणजी यांचे आज्ञानुवर्ती मुनीश्री उदीतकुमारजी ठाणा ६ यांचा विदाई सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी सकाळी अणुव्रत ...

Vihar of Munishri Udit Kumarji Thana 6 from Jalgaon | मुनीश्री उदीतकुमारजी ठाणा ६ यांचा जळगाव येथून विहार

मुनीश्री उदीतकुमारजी ठाणा ६ यांचा जळगाव येथून विहार

जळगाव : आचार्य श्री महाश्रमणजी यांचे आज्ञानुवर्ती मुनीश्री उदीतकुमारजी ठाणा ६ यांचा विदाई सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी सकाळी अणुव्रत भवन येथे झाला.

तेरापंथ महिला मंडळाच्या सुनीता चोरडिया, रिटा बैद, मोनिका छाजेड, खुशबू बाफना, रोनक चॊरडिया यांनी मंगलाचरण गीत सादर केले. कीर्ती शामसुखा, विमलचंद मालू, राजकुमार सेठिया, पवन शामसुखा, वीणा छाजेड, हिमांशू छाजेड, सानवी छाजेड, विनिता समदरिया, आकांक्षा राका, ठाकरमल सेठिया, धनराज राका, नम्रता सेठिया, तेरापंथ प्रोफेशनल फोरमचे अध्यक्ष पंकज छाजेड, तेरापंथ युवक परिषदचे अध्यक्ष रितेश छाजेड, तेरापंथ महिला मंडळाच्या अध्यक्षा निर्मला छाजेड, तेरापंथ सभेचे अध्यक्ष माणकचंद बैद आदींनी मनोगत व्यक्त केले. मुनीश्री डॉ.पुलकीतकुमारजी, मुनीश्री अनंतकुमारजी यांनीही मार्गदर्शन केले.

मुनी श्री उदीतकुमारजी ठाणा-६ जळगाव येथून पहूर, अजिंठा लेणी, जामनेर, भुसावळ, बऱ्हाणपूर, नेपानगर आदी ठिकाणी जाऊन इंदूर येथे जाणार आहे, अशी माहिती तेरापंथ सभेचे नोरतमल चोरडिया यांनी दिली. सूत्रसंचालन नीरज समदडिया यांनी केले तर तेरापंथ सभेचे मंत्री प्रकाश कोठारी यांनी आभार मानले.

Web Title: Vihar of Munishri Udit Kumarji Thana 6 from Jalgaon