शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

मोबाईलवर बोलणे ठरले विद्या पाटील यांना घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:41 PM

संशयाचे भूताने घेतला बळी

ठळक मुद्दे: तपासात अनेक बाबींचा होतोय उलगडा

जळगाव/जामनेर : सतत मोबाईलवर बोलणे हेच अ‍ॅड.विद्या राजपूत उर्फ राखी पाटील यांना घातक ठरले आहे. डॉक्टर पतीला तेच संशयाचे कारण ठरले अन् त्यातूनच त्याने पत्नीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संशयाच्या पलीकडे डॉक्टर काहीच बोलायला तयार नाही.दरम्यान, सदैव हसतमुख व मनमोकळ्या स्वभाच्या विद्या राजपूत त्यांच्या मनातील भावना या जामनेर येथील न्यायालयातील महिला सहकारी वकीलांजवळ बोलुन दाखवीत होत्या. पतीचा संशयी स्वभाव व त्यातून उडणारे खटके याचा उल्लेखही त्यांच्या बोलण्यातून व्हायचा असे त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकारी महिला वकीलांनी सांगितले.आपल्या हसतमुख स्वभावामुळे विद्या राजपूत सर्वांच्या आठवणीत राहील्या. पतीसोबत त्यांचे वादविवाद होत असले तरी त्यांनी कधीही त्यांची तक्रार केली नाही.राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. तत्पुर्वी त्या प्रशिक्षणासाठी नागपुरला दिड महीना होत्या. याकाळात एकदा त्यांच्या मोठ्या मुलाने फोनवरुन पप्पा कुणातरी महिलेला घरी घेऊन आल्याचे सांगितले, याबाबत देखील त्यांनी विषय काढल्याचे त्यांच्या सहकारी महिला वकिलांनी सांगितले.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धुळे येथे झाले. लग्नानंतर त्यांनी एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून २०१० साली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पदवी संपादन केली. नंतर त्यांनी जामनेर येथे वकिली व्यवसाय सुरू केला. त्या जामनेर वकील संघाच्या २०१० ते २०१६ पावेतो सदस्य होत्या. कौटुंबिक जबाबदारी व वकील व्यवसाय सांभाळून त्यांनी आपले पदवीनंतरचे एल.एल.एम. चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मराठवाडा विद्यापीठातून २०१३ साली त्यांनी पदवी प्राप्त केली. सन २०१६-२०१७ मध्ये सहायक सरकारी अभियोक्ता (वर्ग १) पदाची परीक्षा त्यांनी दिली. त्यात त्या प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. ६ आॅक्टोंबर २०१७ पासून जळगाव न्यायालयात कार्यरत होत्या.राजपूत यांना येथील जळगाव व जामनेर न्यायालयात बुधवारी श्रध्दांजली वाहण्यात आली. दुपारपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आले. यावेळी न्या. एम.एम.चितळे, न्या.सचीन हवेलीकर, न्या. ए. ए. कुलकर्णी, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुनील पाटील, वकील संघाचे पदाधीकारी, सदस्य उपस्थीत होते.दरम्यान, संशयितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.महाजन, अ‍ॅड.संजय राणे, रत्ना चौधरी, अनुराधा वाणी, अंबुजा वेदालंकार, लिलावती चौधरी व इतरांनी बुधवारी अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.पती डॉ.भरत पाटील याचा पतसंस्थेत वाददरम्यान, पोलिसांनी फॉरेंसीक व ठसे पथकातील अधिका-यासोबत घरात जाऊन पाहणी केली. घटनेनंतर डॉ.पाटील यांनी ज्या गाडीतुन पत्नीला बेलवाडी येथे नेले ती गाडी कोण चालवीत होता याचीही चौकशी पोलीस करीत आहेत. दरम्यान, घटनेच्या दोन दिवस आधी डॉ.पाटील शहरातील एका खाजगी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या कार्यालयात नवीन चारचाकी वाहनाच्या खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी गेले होते. याठिकाणी त्यांचा संबंधीत कर्मचाºयाशी वाद झाल्याचे समजले. ही चारचाकी ते कुणासाठी घेत असावे याची चर्चा होत आहे.जळगाव न्यायालयात कामकाज बंदविद्या राजपूत यांच्या मृत्यूमुळे बुधवारी जळगाव न्यायालयातील सकाळसत्राचे कामकाज बंद ठेवण्यात आले. दुपारी दोन वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांच्या न्यायालयात शोकसभा घेण्यात आली. विद्या पाटील यांच्या मृत्यूमुळे न्यायालय कर्तव्यदक्ष वकीलाला मुकल्याची भावना न्या.सानप यांनी व्यक्त केली. वकील संघाची कधीही न भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर.आर.महाजन यांनी व्यक्त केली. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनीही श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Murderखून