VIDEO : अंजली दमानिया व माजी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाची तू तू मैं मै

By Admin | Updated: March 7, 2017 15:44 IST2017-03-07T12:59:49+5:302017-03-07T15:44:14+5:30

ऑनलाइन लोकमत मुक्ताईनगर (जळगाव), दि. ७ -  न्यायालयीन कामकाजासाठी मुक्ताईनगरात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया व माजी मंत्री एकनाथराव ...

VIDEO: Anjali Damania and the former minister's helpers, | VIDEO : अंजली दमानिया व माजी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाची तू तू मैं मै

VIDEO : अंजली दमानिया व माजी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाची तू तू मैं मै

ऑनलाइन लोकमत
मुक्ताईनगर (जळगाव), दि. ७ -  न्यायालयीन कामकाजासाठी मुक्ताईनगरात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांची तहसीलदारांच्या दालनात चांगलीच शाब्दिक चकमक झाली़. मंगळवारी सकाळी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या दालनात दमानीया आल्या़ मुक्ताईनगरातील अतिक्रमणा संदर्भात उपोषणार्थी उपोषणास बसल्या होत्या.  त्या संदर्भात विचारणा करण्यासाठी त्या बसलेल्या असतानाच कोलते तेथे दाखल झाले. तहसीलदारांच्या शेजारीच असलेल्या रिकाम्या खुर्चीवर ते बसताच दमानीया यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. हा कायद्याचा भंग आहे, असे म्हणत त्यांनी त्यांना तेथे बसू देण्यास मज्जाव केला. मात्र कोलते यांनी आपण माजी मंत्री व आमदार खडसे यांचे स्वीय सहाय्यक असून विधी मंडळाची कागदपत्रे तातडीने पाठवायची असल्याने बसल्याचे सांगत आपण येथे बसू शकतो, असे सांगितले. प्रसंगी दमानिया यांच्या सोबत आलेल्या गजानन मालपूरे व इतरांनीही आक्षेप नोंदवला़ यानंतर दमानिया दालनाबाहेर पडल्याने वादावर पडदा पडला.
 
 

https://www.dailymotion.com/video/x844tqd

Web Title: VIDEO: Anjali Damania and the former minister's helpers,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.