सर्वसामान्य जनतेचा विजय

By Admin | Updated: May 16, 2014 23:46 IST2014-05-16T23:46:15+5:302014-05-16T23:46:15+5:30

धुळे : जनतेने पैशांची अपेक्षा न करता उत्स्फूर्तपणे मतदान व सहकार्य केले़ त्यामुळे डॉ़ सुभाष भामरे विजयी झाले़

Victory of the general public | सर्वसामान्य जनतेचा विजय

सर्वसामान्य जनतेचा विजय

धुळे : जनतेने पैशांची अपेक्षा न करता उत्स्फूर्तपणे मतदान व सहकार्य केले़ त्यामुळे डॉ़ सुभाष भामरे विजयी झाले़ मी खूप आनंदी आहे़ सर्व स्तरातील नागरिकांनी या वेळी डॉक्टरांना प्रतिसाद देऊन विजयश्री मिळवून दिली. पराभवानंतर मिळालेला विजयाचा आनंद खूपच वेगळा आहे़ विजयामुळे कामाची जबाबदारी वाढली आहे़ धुळ्याच्या विकासासाठी पती डॉ़भामरे प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा भामरे यांच्या पत्नी बिना भामरे यांनी व्यक्त केली. आम्हाला दोन मुले आहेत़ त्यात मोठा मुलगा राहुल हा मुंबई येथील टाटा वैद्यकीय विद्यालय येथे एम़एस पदवीचे शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगा रोहन हा खरगपूर येथे आयआयटीचे शिक्षण घेत आहे़ डॉक्टरांच्या विजयाने सर्व कुटुंब आनंदी आहेत़ बाबा जिंकल्याचा आनंद-रोहन भामरे धुळे : कुटुंबातील सर्व सदस्य आनंदीत आहे़ अखेर बाबांनी विजय प्राप्त केला़ धुळ्यातील नागरिकांनी त्यांना भरघोष मतांनी विजय मिळवून दिला़ त्यामुळे मी खूश आहे़ मोठा भाऊ राहुल भामरे मुंबईत आहे़ बाबा विजयी झाल्याची माहिती मिळताच दादा धुळ्याकडे निघाला आहे़ आमच्या परिवारातील सर्व सदस्य एकत्रित आले आहेत़ गेल्या वेळी बाबांना पराभव स्वीकारावा लागला होता़ मात्र बाबांनी प्रयत्न सोडले नाहीत़ बाबांची लढण्याच्या इच्छा शक्तीने त्यांना विजयी केले आहे़ कुटुंब, मित्रपरिवार व नागरिकांनी त्यांना विजयी केले आहे़ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया डॉ़ सुभाष भामरे यांचे कनिष्ठ चिरंजीव रोहन यांनी दिली़ कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित येऊन विजयाचा आनंदोत्सव साजरा करीत आहोत. त्यामुळे समाधान वाटत आहे.

Web Title: Victory of the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.