पोस्ट कोरोनाच्या विळख्यात;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:21 IST2021-08-22T04:21:30+5:302021-08-22T04:21:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड : तालुक्यात भानखेडा गावात कोरोनाने आपले हातपाय पुन्हा पसरवायला सुरुवात केली असून, आतापर्यंत गावात ...

In the vicinity of the post corona; | पोस्ट कोरोनाच्या विळख्यात;

पोस्ट कोरोनाच्या विळख्यात;

लोकमत न्यूज नेटवर्क

बोदवड : तालुक्यात भानखेडा गावात कोरोनाने आपले हातपाय पुन्हा पसरवायला सुरुवात केली असून, आतापर्यंत गावात कोरोनाचे १६ रुग्ण आढळले होते. त्यापैकी सात ते आठ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. २० रोजी एक रुग्ण उपचारादरम्यान कोरोना निगेटिव्ह येऊन पोस्ट कोविडचा हा रुग्ण दगावला आहे.

तालुक्यातील भानखेडा येथे कृषी केंद्रचालक असलेले ५२ वर्षीय भगवान निकम, त्यांची पत्नी व मुलगी ९ ऑगस्ट रोजी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.

काही दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी व मुलगी कोरोनामुक्त झाले होते. तथापि, दि. २० ऑगस्ट रोजी जळगाव येथे उपचारादरम्यान भगवान निकम यांचा जळगाव येथे मृत्यू झाला आहे.

पोस्ट कोविडने मृत्यू झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज चौधरी यांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वी भगवान निकम यांची हृदयशस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: In the vicinity of the post corona;