पहिल्याच दिवशी 30 ट्रॅक्टर कचरा संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 00:35 IST2017-05-08T00:35:42+5:302017-05-08T00:35:42+5:30

सत्ताधारी उतरले रस्त्यावर : सामाजिक संस्थांची मदत घेत शिवाजीनगरची झाली स्वच्छता

On the very first day 30 tractor garbage collections | पहिल्याच दिवशी 30 ट्रॅक्टर कचरा संकलन

पहिल्याच दिवशी 30 ट्रॅक्टर कचरा संकलन

भुसावळ : अस्वच्छ शहर हा कलंक पुसून काढण्यासाठी सत्ताधा:यांनीही हातात झाडू घेत रविवारी शहरातील शिवाजीनगरासह डी़ एल़ हिंदी हायस्कूल परिसराची स्वच्छता केली़ सुमारे 30 ट्रॅक्टर कच:याचे प्रसंगी संकलन करण्यात आल़े
शनिवारी पालिका सभागृहात शहर स्वच्छतेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होत़े सामाजिक संस्थांची मदत घेत शहर स्वच्छतेबाबत नियोजन करण्याचे ठरल्यानुसार रविवारी सकाळी साडेसात वाजता विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी व पालिकेचे पदाधिकारी नगरपालिका कार्यालयाच्या आवारात जमल़े
पालिकेसमोरील महामानव डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून स्वच्छता अभियानास सुरुवात झाली़
सुरुवातीला शिवाजीनगरच्या कोप:यावरील घाण तसेच काही भागातील गटारी स्वच्छ करण्यात आल्या तसेच डी़ एल़ हिंदी विद्यालयामागील कचरा, उकिरडे स्वच्छ करण्यात आल़े सुमारे 30 ट्रॅक्टर कच:याचे संकलन प्रसंगी करण्यात आल़े
स्वच्छता अभियानात नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर, न.पा.गटनेते मुन्ना तेली, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, नगरसेवक निर्मल कोठारी, प्रा.दिनेश राठी, परीक्षित ब:हाटे, पुरुषोत्तम नारखेडे, लक्ष्मी मकासरे, शैलजा पाटील, निक्की बत्रा, राजू खरारे, गिरीश महाजन, सतीश सोनवणे, मुकेश  गुंजाळ, जुबेर पठाण, मुकेश पाटील, प्रा़धीरज पाटील, अॅड़ बोधराज चौधरी. प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, प्रदीप पवार, हर्षल पाटील, बापू महाजन, महेंद्रसिंग ठाकूर, राजेश्वरी सुरवाडे, भाजप सरचिटणीस रमाशंकर दुबे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी सहभागी झाल़े सहा ट्रॅक्टर व एका जेसीबी मशीनची स्वच्छतेसाठी मदत घेण्यात आली़
नगरसेवक कोठारींना अपमानास्पद वागणूक
4जनतेच्या मनातील खदखद शनिवारी पालिका सभागृहात ठासून मांडणा:या नगरसेवक निर्मल कोठारी यांना रविवारी सकाळी नगराध्यक्ष यांनी एकेरी भाषेत अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगण्यात आले. सत्ताधा:यांनाच कोठारींनी घरचा अहेर दिला होता़ कोठारी यांच्याशी संपर्क साधला मात्र होऊ शकला नाही़
शहर स्वच्छतेसंदर्भात पालिकेने आराखडा तयार केला आह़े रविवारी पहिल्या टप्प्यात शिवाजीनगर व परिसराची स्वच्छता करण्यात आली़ अस्वच्छ शहराचा डाग पुसून टाकण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित आह़े पालिका लवकरच शहराची व नाल्यांची स्वच्छता करणार आह़े जनआधारच्या नगरसेवकांशी वा नगरसेवक निर्मल कोठारी यांच्याशी कुठलाही वाद झाला नाही़ राजकारण बाजूला ठेवून व मतभेद विसरून सर्वानी शहराच्या स्वच्छतेसाठी एकत्र येण्याची गरज आह़े     -रमण भोळे, नगराध्यक्ष

Web Title: On the very first day 30 tractor garbage collections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.