मराठा समाजाच्या तरुणांच्या कागदपत्रांची पडताळणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:12+5:302020-12-04T04:42:12+5:30
निवेदनात म्हटले आहे की, दि. १ व २ डिसेंबरला महावितरणतर्फे कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. परंतु या कागदपत्रे ...

मराठा समाजाच्या तरुणांच्या कागदपत्रांची पडताळणी करा
निवेदनात म्हटले आहे की, दि. १ व २ डिसेंबरला महावितरणतर्फे कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. परंतु या कागदपत्रे पडताळणीमधून मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. हा मराठा समाजावर अन्याय आहे. एसईबीसी प्रवर्गात निवड झालेल्या तरुणांचीसुद्धा कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात यावी. तसेच मराठा समाजातील मुलांना भरतीप्रक्रियेत डावलून एक प्रकारे मराठा समाजाची अवहेलना केली जात आहे. या विरोधात मराठा समाजात प्रचंड संतापाची भावना आहे.
महावितरणच्या या कृतीचा जळगाव मराठा क्रांती मोर्चातर्फे जाहीर निषेध करण्यात येत असून, झालेली चूक तात्काळ सुधारण्यात यावी, अशी मागणी प्रमोद पाटील, गणेश पवार, रवि देशमुख, विनोद देशमुख, गणेश पाटील, रामधन पाटील, अविनाश पाटील, देवेंद्र पाटील, संजय कापसे, गुणवंत पाटील, गुलाबराव आभाळे, विशाल देशमुख, बाबुलाल चव्हाण, योगेश कदम, संजय शिंदे, सुरेश पवार आदी मराठा समाज बांधवांनी केली आहे.