शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

व्हेंटिलेटर बनले शोभेच्या वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 2:53 PM

रुग्णालयात उपलब्ध झालेल्या दहापैकी एकही व्हेंटिलेटर अद्याप कार्यान्वित नसल्याने ते शोभेच्या वस्तू ठरत आहे

ठळक मुद्देमुक्ताईनगर : कोविड रुग्णांसाठी तासाला लागतो एक आॅक्सिजन सिलेंडरसध्या कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या कमी होत आहेसध्या हायफ्लो यंत्राद्वारेच गंभीर रुग्णना आॅक्सिजन दिले जात आहे

मतीन शेखमुक्ताईनगर : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड डेडिकॅटेड कक्षात ४० कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून एका तासाला एक जम्बो आॅक्सिजन सिलेंडर संपत आहे. सध्या गंभीर रुग्णांची संख्या घटत असल्याने दर दिवसाला लागणारे २१ आॅक्सिजन सिलेंडरची संख्या आता १७ वर आली आहे, तर रुग्णालयात उपलब्ध झालेल्या दहापैकी एकही व्हेंटिलेटर अद्याप कार्यान्वित नसल्याने ते शोभेच्या वस्तू ठरत आहे.उपजिल्हा रुग्णालयातील कोविड डेडिकॅटेड कक्ष सुरू झाल्यापासून आॅक्सिजन सिलेंडरसाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. अवघे १५ आॅक्सिजन सिलेंडर उपजिल्हा रुग्णालयाकडे होते. यामुळे अडचणी सोडविण्यास प्रथम बोदवड ग्रामीण रुग्णालयातील २० आॅक्सिजन सिलेंडर आणून रुग्णांना आॅक्सिजन देण्याची सांगड बसविली जात होती.३० आॅक्सिजन सिलेंडर उसनवारीवरदिवसभरात लागणारे आॅक्सिजन सिलेंडर २१ आणि उपलब्ध ३० त्यात जळगाववरून भरून आणण्यास भाडे पुरावे म्हणून गाडीत किमान २० सिलेंडर आवश्यक अशा कसरतीतून मार्ग काढण्यासाठी शेवटी आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन कडून ३० सिलेंडर उसनवारी घेतले गेले आणि ५० सिलेंडरच्या भरवशावर रूग्णांना आॅक्सिजन दिले जात आहेदररोज लागतात १७ सिलेंडरउपजिल्हा रुग्णालयातील कोविड डेडिकॅटेड सध्या कक्षात ४० कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना तासा मागे एक आॅक्सिजन सिलेंडर लागत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या दिवसाला २१ ऐवजी १५ ते १७ सिलेंडर लागत आहे. आज रोजी येथे दाखल बाधित रूग्णांपैकी किमान २० ते २२ रूग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे. त्या अनुषंगाने २० तासाचा आॅक्सिजन साठा सध्या उपलब्ध राहत आहे.व्हेंटिलेटर बंदचया कोविड डेडिकॅटेड सेंटरला खासदार रक्षा खडसे यांनी केंद्र शासनाकडून १० व्हेंटिलेटर मिळवून दिले आहे, तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी ४ हायफ्लो हे आॅक्सिजन देण्यासाठी उपयुक्त यंत्र मिळवून दिले आहे. शोकांतिका म्हणजे केंद्राकडून आलेले व्हेंटिलेटरचे जुळवणी साहित्य नसल्याने दहापैकी एक व्हेंटिलेटर वापरात नाही. सध्या हायफ्लो यंत्राद्वारेच गंभीर रुग्णना आॅक्सिजन दिले जात आहे.सध्या कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज रोजी १५ ते १७ आॅक्सिजन सिलेंडर दररोज लागत आहे. रुग्णालयातील व्हेंटिलेटर तांत्रिक जुळवणी साहित्यअभावी अद्याप कार्यान्वित झालेले नाही.-डॉ.योगेश राणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय ,मुक्ताईनगर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर