त्या व्हेंटिलेटरला प्रमाणपत्र, गुणवत्ता, विद्युत सुरक्षाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:20+5:302021-08-21T04:21:20+5:30

जळगाव : लक्ष्मी सर्जिकलकडून जिल्हा रुग्णलयाला पुरवठा झालेल्या ३० व्हेंटिलेटरमध्ये गुणवत्ता व्यवस्थापन तसेच विद्युत सुरक्षा मानक यासह अनेक महत्त्त्वाच्या ...

That ventilator has no certificate, quality, electrical safety | त्या व्हेंटिलेटरला प्रमाणपत्र, गुणवत्ता, विद्युत सुरक्षाच नाही

त्या व्हेंटिलेटरला प्रमाणपत्र, गुणवत्ता, विद्युत सुरक्षाच नाही

जळगाव : लक्ष्मी सर्जिकलकडून जिल्हा रुग्णलयाला पुरवठा झालेल्या ३० व्हेंटिलेटरमध्ये गुणवत्ता व्यवस्थापन तसेच विद्युत सुरक्षा मानक यासह अनेक महत्त्त्वाच्या बाबी चौकशीत आढळूनच आलेल्या नसून मागणी व प्रत्यक्षात पुरविण्यात आलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठी तफावत असल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे. हा चौकशी अहवाल विश्वसनीय सूत्रांकडून समोर आला आहे.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली ३० व्हेंटिलेटरची खरेदी प्रक्रिया राबविली होती. याबाबत २८ मे रोजी कॉन्ट्रॅक्टला मंजूरी देण्यात आली होती. यात जेईएम पोर्टलवर प्रोटॉन प्लस या मॉडेलला मंजूरी देण्यात आली होती. मात्र, लक्ष्मी सर्जिकलने १९ जुलै व २१ जुलै रोजी या ३० व्हेंटिलेटरचा पुरवठा केला. २ ऑगस्ट रोजी या व्हेंटिलेटरचे इन्स्टॉलेशन होत असताना माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी यावर आक्षेप नोंदविला. यावेळी मंजूरी मिळालेले व्हेंटिलेटर व प्रत्यक्षात आणलेले व्हेंटिलेटर व त्यांचे मॉडेल नंबर हे मॅच होत नसल्याचे भांडारपाल मिलिंद काळे, एजन्सी प्रतिनिधी घनश्याम पाटील, लिपिक जितेंद्र परदेशी यांनी याबाबत भोळे यांना लेखी दिले होते. त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी भोळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना तक्रार दिली होती.

कोट

झालेली कारवाई मान्य नाही. या प्रकरणात निविदा रद्द झालीच पाहिजे. मात्र, पुरवठादार लक्ष्मी सर्जिकलला काळ्या यादीत टाकले जावे, हा रुग्णांच्या जीवाशी खेळ असून जर या प्रकरणाला वाचा फोडली नसतील तर हेच व्हेंटिलेटर ठेवून घेतले असते. अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. - दिनेश भोळे, माहिती अधिकार कार्यकर्ते

Web Title: That ventilator has no certificate, quality, electrical safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.