पोलीस स्टेशन आवारातील वाहनांचा होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:42+5:302021-07-15T04:12:42+5:30

शहर पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस स्थितीत मिळून आलेल्या मोटारसायकली बऱ्याच वर्षांपासून पाेलीस स्टेशन आवारात पडून आहेत. यातील काही मूळ ...

Vehicles in the police station yard will be auctioned | पोलीस स्टेशन आवारातील वाहनांचा होणार लिलाव

पोलीस स्टेशन आवारातील वाहनांचा होणार लिलाव

शहर पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस स्थितीत मिळून आलेल्या मोटारसायकली बऱ्याच वर्षांपासून पाेलीस स्टेशन आवारात पडून आहेत. यातील काही मूळ मालकांना त्यांची वाहने कायदेशीर बाबी पूर्ण करून परत करण्यात आली असून अजूनही ५९ वाहने शिल्लक आहेत.

यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करून जाहीर खुला लिलाव करण्याची अनुमती मिळाली असून, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी ठरवून दिलेल्या किमतीप्रमाणे लिलावाची बोली लावता येणार आहे.

दिनांक १५ रोजी सकाळी १० वाजता चोपडा शहर पोलीस स्टेशन आवारात लिलावाला सुरुवात होणार असून परवानाधारक भंगार विक्रेते यात सहभागी होऊ शकतात, असे आवाहन चोपडा शहर पो. स्टे.चे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Vehicles in the police station yard will be auctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.