दुभाजकांवर वाहने आदळून १५ दिवसांत दोन खांब कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:29+5:302021-08-21T04:21:29+5:30

कजगाव, ता. भडगाव : जळगाव-चांदवड या मार्गावर कजगाव येथे गाव अंतर्गत दुभाजक टाकत यात पथदिवे लावण्यात आले, मात्र लहान ...

Vehicles collided with the dividers and two pillars collapsed in 15 days | दुभाजकांवर वाहने आदळून १५ दिवसांत दोन खांब कोसळले

दुभाजकांवर वाहने आदळून १५ दिवसांत दोन खांब कोसळले

कजगाव, ता. भडगाव : जळगाव-चांदवड या मार्गावर कजगाव येथे गाव अंतर्गत दुभाजक टाकत यात पथदिवे लावण्यात आले, मात्र लहान दुभाजकामुळे वाहन दुभाजकावर आदळून थेट वीज खांबावर धडकत असल्याने गेल्या १५ दिवसांत दोन खांब कोसळले, तर चार महिन्यांत चार खांब कोसळले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुभाजकाला सुरक्षा जाळी बसवावी किंवा दुभाजकाची रुंदी वाढवावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांकडून होत आहे.

सूत्रांनुसार, जळगाव चांदवड या नव्याने बनलेल्या सिमेंट रस्त्यावर कजगाव येथे गाव अंतर्गत दुभाजक टाकण्यात आले आहेत. यात विद्युत खांब बसवून त्यात दिवे बसविण्यात आले. मात्र या दुभाजकाची रुंदी कमी असल्याने सुसाट धावणारी वाहने दुभाजकावर आदळत आहेत.

गेल्या चार महिन्यांअगोदर सी.टी. पाटील नगरसमोर सुसाट वाहनाने दुभाजकावर आदळत सरळ वीज खांबावर आदळल्यामुळे खांब कोसळले होते. ही घटना रात्रीची असल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. यानंतर याच भागात वाहनांच्या धडकेत एक खांब कोसळला.

गेल्या १५ दिवसांपूर्वी कालिका फ्रुट कंपनीसमोर वाहनांच्या धडकेने एक खांब कोसळला. हा खांब अद्याप बसविण्यात आलेला नाही.

दरम्यान, १२ च्या रात्री मयूर इलेक्ट्रॉनिक दुकानासमोरील खांब अज्ञात वाहनाने जमीनदोस्त केला. आतापर्यंत चार खांब हे सुसाट वाहनांच्या धडकेत कोसळले आहेत. या घटना रात्रीच घडल्यामुळे जीवितहानी झाली नाही. या घटना दिवसा झाल्या असत्या तर यात मोठी दुर्घटना घडली असती. यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली असती. कारण कजगाव बसस्थानक चौक म्हणजे चौपाटीच, कारण या ठिकाणी मोठी वर्दळ असते. सुदैवाने चारही घटना या रात्री घडल्यामुळे जीवितहानी टळली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या महत्त्वपूर्ण मागणीकडे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दुभाजकाला सुरक्षा जाळी किंवा दुभाजकाची रुंदी वाढविण्याबाबतचे आदेश द्यावेत. कोसळलेले वीज खांब तत्काळ बसविण्याचेही आदेश द्यावेत.

Web Title: Vehicles collided with the dividers and two pillars collapsed in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.