मंगरूळ शाळेजवळ दुभाजकावर वाहन आदळून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:45+5:302021-09-05T04:19:45+5:30

नाशिककडून टोमॅटो भरून विक्रीसाठी आणणारी पिकअप व्हॅन (एमएच १५/जीव्ही ५११) ही समोरून येणाऱ्या मोटारसायकलला चुकवायला गेली असता मंगरूळ येथील ...

Vehicle collides with a divider near Mangrul School | मंगरूळ शाळेजवळ दुभाजकावर वाहन आदळून अपघात

मंगरूळ शाळेजवळ दुभाजकावर वाहन आदळून अपघात

नाशिककडून टोमॅटो भरून विक्रीसाठी आणणारी पिकअप व्हॅन (एमएच १५/जीव्ही ५११) ही समोरून येणाऱ्या मोटारसायकलला चुकवायला गेली असता मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाजवळ असलेले दुभाजक न दिसल्याने वाहन दुभाजकावर चढून ५० मीटरपर्यंत ओढत गेले. त्यानंतर वाहन रस्त्यावर कलंडले. धुळ्याकडून येताना रस्ता मोकळा असून, अचानक शाळेजवळ दुभाजक लागतात, त्यामुळे वाहनचालक गोंधळतात. यापूर्वीही १६ वाहनांना याठिकाणी दुभाजक न दिसल्याने अपघात झाले असून, वाहनांचे नुकसान होऊन काही जण बचावले आहेत.

याठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. मात्र, सूचना फलक अथवा रिफ्लेक्टर लावलेले नाही, म्हणून वाहने दुभाजकावर आदळतात आणि अपघात होतात. दुभाजक दिसण्यासाठी मोठा लाइट अथवा रेडियम रिफ्लेक्टर लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

040921\04jal_3_04092021_12.jpg

दुभाजक न दिसल्याने पलटी झालेली पिकअप व्हॅन. (छाया : अंबिका फोटो अमळनेर)

Web Title: Vehicle collides with a divider near Mangrul School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.