म्हशी नेणारे वाहन चाळीसगावी नागरिकांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 23:29 IST2020-07-31T23:29:36+5:302020-07-31T23:29:45+5:30
गुन्हा दाखल

म्हशी नेणारे वाहन चाळीसगावी नागरिकांनी पकडले
आडगाव, ता. चाळीसगााव : नियमाचा भंग करीत गाडीत म्हशी कोंबून नेताना नागरिकांनी हे वाहन पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना चाळीसगाव येथे घडली.
याबाबत वृत्त असे की, शुक्रवारी दुपारी ४ च्या दरम्यान म्हशी कोबुन घेऊन जाणारी पिकअप गाडी (०४ ईबी ८८६९) ही मालेगाव कडे जात असताना साकुर फाटा चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी चालकाने चाळीसगांव च्या दिशेने जोरात वळून गाडी सुसाट नेली. यानंतर सदर पोलिसांनी पिलखोड, टाकळी, आडगाव, येथील नागरिकांना सुचित करून गाडीचा पाठलाग करून गाडी थांबविण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले परंतु चालकाने गाडी बेभान चालवत नेली. शेवटी नागरिकांनी शिताफीने चाळीसगावी मोठ्या कॉलेजजवळ पकडून गाडी व त्यातील म्हशी पोलिसाच्या स्वाधीन केल्या.