वॉनने ओढले इंग्लंडच्या रणनीतीवर ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:07+5:302021-08-23T04:20:07+5:30

सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या तळाच्या फलंदाजांना शमी आणि बुमराहला सलग बाऊन्सर टाकले होते. या ...

Vaughn pulls Tashree on England's strategy | वॉनने ओढले इंग्लंडच्या रणनीतीवर ताशेरे

वॉनने ओढले इंग्लंडच्या रणनीतीवर ताशेरे

सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या तळाच्या फलंदाजांना शमी आणि बुमराहला सलग बाऊन्सर टाकले होते. या दोघांनी नवव्या गड्यासाठी नाबाद ८९ धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडने भारताला २७२ धावांचे लक्ष्य दिले. त्यानंतर संघ १२० धावांवर बाद झाला.

वॉन याने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, दुसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी लंचच्या आधी २० मिनिटे जे बघायला मिळाले ते इंग्लंडच्या कसोटी संघाने गेल्या अनेक वर्षात दाखवले नव्हते इतके वाईट होते.

इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला बाऊन्सर टाकणाऱ्या बुमराह हा जेव्हा फलंदाजीला आता त्याला देखील बाऊन्सरचा सामना करावा लागला. त्या दरम्यान मार्क वुड आणि यष्टिरक्षक बटलर यांची त्याच्याशी बाचाबाचीदेखील झाली.

इंग्लंडची ही रणनीती फायदेशीर ठरली नाही. आणि बुमराह आणि शमी यांनी भारताला उत्तम स्थितीत नेले.

वॉनने लिहिले की, याबाबत खूप काही लिहिले गेले आहे. जसप्रीत बुमराहला बाऊन्सर टाकण्याची इंग्लंडची रणनीती त्यांच्यावरच उलटली. रुटला काही वरिष्ठ खेळाडूनी निराश केले. त्यांनी यात लगेच हस्तक्षेप करायला हवा होता. मात्र मी प्रशिक्षकांकडून हस्तक्षेपाची आशा करत होतो.’

त्याने म्हटले की, सिल्व्हरवुड यांनी रुटला हे सांगण्यासाठी कुणालातरी पाणी घेऊन मैदानात पाठवायला हवे होते. आणि रणनीती बदलायला हवी होती. मला माहीत आहे की मी जर असे केले असते तर डंकन फ्लेचर यांनीही मला बदल करायला लावला असता. दुसऱ्या सामन्यातील पराभवाला सिल्व्हरवुड देखील जबाबदार आहेत.’

Web Title: Vaughn pulls Tashree on England's strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.