वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी न्हावी येथे महादेवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 15:42 IST2017-07-10T15:42:11+5:302017-07-10T15:42:11+5:30

न्हावी परिसरावर पावसाअभावी तिस:यांदा पेरणीची वेळ

Varun holds the Mahadev at the Navy to please the king | वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी न्हावी येथे महादेवाला साकडे

वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी न्हावी येथे महादेवाला साकडे

ऑनलाईन लोकमत

न्हावी, ता.यावल,दि.10 - काही दिवसांपासून न्हावीसह परिसरातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतातील पिके पावसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. समाधानकारक पाऊस व्हावा यासाठी येथील महादेव मंदिरात अभिषेक करुन देवाला साकडे घालण्यात आले.
मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, उपसरपंच अनिल चौधरी यांच्या हस्ते पूजा करुन महादेवाला साकडे घालण्यात आले. यावेळी मिलिंद महाजन, प्रल्हाद बोरोले, टेणू बोरोले, एम.के.चौधरी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. न्हावी आणि परीसरात पाऊस लांबला आहे. त्यामुळे दुबार, तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले. 
 

Web Title: Varun holds the Mahadev at the Navy to please the king