राष्ट्रवादी वर्धापन दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST2021-06-10T04:13:20+5:302021-06-10T04:13:20+5:30

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आज, गुरुवारी १० जून रोजी जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ...

Various programs today on the occasion of Nationalist Anniversary | राष्ट्रवादी वर्धापन दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

राष्ट्रवादी वर्धापन दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आज, गुरुवारी १० जून रोजी जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण केले जाणार आहे. जनतेला कोरोनाच्या संकटातून वाचविण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात दिल्या आहेत. लसीकरणाच्या बाबतीत जनतेच्या मनातील गैरसमज दूर करणे , इतर आजार आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांकडे लक्ष देऊन जनतेला मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा कार्यालयात सकाळी १०.१० वाजता ध्वजारोहण केले जाईल. त्यानंतर वृक्षारोपण आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केले आहे.

Web Title: Various programs today on the occasion of Nationalist Anniversary