वरणगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र नगरला पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 22:38 IST2020-06-26T22:37:52+5:302020-06-26T22:38:18+5:30
आॅर्डनन्स फॅक्टरीलगत मंजूर करण्यात आलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे पळविण्यात आले आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

वरणगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र नगरला पळविले
वरणगाव, ता.भुसावळ : येथील आॅर्डनन्स फॅक्टरीलगत मंजूर करण्यात आलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे पळविण्यात आले आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
तत्कालिन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून १९९९ मध्ये राज्य राखीव पोलीस बल गट प्रशिक्षण केंद्र वरणगाव, ता.भुसावळ येथे मंजूर झाले होते. त्याचे भूमिपूजनही झाले होते. मात्र आता शासन आदेशानुसार, हे प्रशिक्षण केंद्र अहमद नगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला आहे.