वराडसिमला पोलिसांना शिवीगाळ, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:17+5:302021-09-08T04:21:17+5:30
तालुका पोलीस ठाणे अंतर्गत वराडसिमला पोळा सणानिमित्त चोख बंदोबस्त लावण्यात आला होता, सहा. पोलीस निरीक्षक अमोल पवार, हवालदार ...

वराडसिमला पोलिसांना शिवीगाळ, गुन्हा दाखल
तालुका पोलीस ठाणे अंतर्गत वराडसिमला पोळा सणानिमित्त चोख बंदोबस्त लावण्यात आला होता, सहा. पोलीस निरीक्षक अमोल पवार, हवालदार वाल्मीक सोनवणे, युनूस शेख, दीपक जाधव, गणेश गव्हाळे, उमेश बारी, राजेंद्र पवार, राहुल महाजन हे बंदोबस्तावर असताना संशयित सुनील पाटील हा बसस्थानक चौकात जोरजोरात आरडाओरडा करून शिवीगाळ करत असल्याचे पोलिसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. संशयिताने न जुमानता शिवीगाळ केली तसेच रस्त्यावर पडलेले दगड पोलिसांच्या अंगावर भिरकवण्याच्या उद्देशाने अंगावर धावून आला, त्यात ताब्यात घेण्यात आले तसेच पाटील याने वाहनाच्या दरवाजावर डोके आपटून स्वत:ला जखमसुद्धा केली. याप्रकरणी संशयित विरोधात राहुल महाजन यांच्या फिर्यादीनुसार शासकीय कामकाजात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.