शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण एक अटकेत, चार आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:21 IST

गिरणा नदीच्या पात्रात वाळू माफियांनी शनिवारी सकाळी हैदोस घालत मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले तर वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण करून त्याच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लुटून नेला.

ठळक मुद्देमहसूल प्रशासनाच्या पथकाने वाळू चोरतांना पकडलेवाळू माफियांची पुन्हा मुजोरी वाढली

धरणगाव/ खेडी कढोली ता. एरंडोल : धरणगाव तालुक्याच्या हद्दीत व वैजनाथ ता.एरंडोल (सावखेडा)गिरणा नदी पात्रातून वाळूची तस्करी करणाºया पाच वाळू माफीयांनी मंडळ अधिकाºयाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून व मारहाण करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर वैजनाथचे पोलीस पाटील यांनाही मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लुटून पलायन केल्याची घटना २७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.या घटनेने जिल्ह्यात वाळूची तस्करी करणाºया वाळू माफीयांची मुजोरी पुन्हा वाढल्याचे सिध्द झाले आहे.या प्रकाराने महसूल कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील एका आरोपीस अटक करण्यात आली असून चार आरोपी फरार झाले आहेत.पोलीस सूत्रानुसार, वैजनाथ ता.एरंडोल येथे गट नं.१०८ च्या गिरणा नदी पात्रात धरणगाव तालुक्याच्या हद्दीत एरंडोल तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकारी मुकेश सदाशिव जाधव रा.जळगाव यांना आरोपी बंड्या विकास पाटील रा.रायसोनी नगर जळगाव, मुरलीधर आनंदा सोनवणे रा.खेडी ता.जळगाव, रवि हातोडे रा.धानोरा ता.जळगाव तसेच एम.एच.१९ एपी- ९५६१ या ट्रॅक्टरवरील ड्रायव्हर, तसेच एम.एच.१९ सीजे १७५८ वरील ड्रायव्हर हे पाच जण गिरणा नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक करतांना आढळले. त्यांना पकडून तहसिल कार्यालयात दोन्ही ट्रॅक्टर आणण्यास सांगितले असता सर्व आरोपींनी मंडळ अधिकारी मुकेश जाधव यांच्याशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केली तसेच त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या वेळी तेथे उपस्थित असलेले वैजनाथ येथील पोलीस पाटील यांनाही मारहाण करुन आरोपींनी त्यांच्या गळ्यातील चाळीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लुटून तेथून पळ काढला.पाळधी दूरक्षेत्र पोलिसात गुन्हा दाखलया घटने संदर्भात पाळधी दूरक्षेत्र पोलिसात मंडळ अधिकारी मुकेश जाधव यांनी पाचही आरोपीविरुध्द फिर्याद दिल्यावरून भादंवि ३०७,३९५, ३७९, ३५३, ३३२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बंड्या पाटील यास अटक करण्यात आली आहे. तर इतर चार आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगदीश मोरे हे करीत आहे. 

टॅग्स :sandवाळू