बुधवारी लसीकरणाचा उच्चांक होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:23+5:302021-09-07T04:22:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासाठी मंगळवारी कोविशिल्डचे २ लाख ८ हजार तर कोव्हॅक्सिनचे ७ हजार ७०० डोस सायंकाळी ...

बुधवारी लसीकरणाचा उच्चांक होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यासाठी मंगळवारी कोविशिल्डचे २ लाख ८ हजार तर कोव्हॅक्सिनचे ७ हजार ७०० डोस सायंकाळी प्राप्त होणार असून त्यातून बुधवारी केंद्रांवर ही लस उपलब्ध होणार आहे. यातून शहराने नोंदविलेल्या मागणीनुसार २० हजार डोस त्यांना देण्यात येतील, अशी माहिती आहे. त्यामुळे बुधवारी लसीकरणाचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात १ लाख ३० हजार नागरिकांचे लसीकरण झाले होते. तर सोमवारी १६ सेशनमध्ये २३४५ नागरिकांनी लस घेतली. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ११ लाख ३३ हजार ३९५ झाली असून ४ लाख ४ हजार १६३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
महापालिकेचे केंद्र आज बंद
लस उपलब्ध नसल्याने महापालिकेचे केंद्र बंद राहणार असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली. दरम्यान, सोमवारी चेतनदास मेहता रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर काहीसा गोंधळ उडाला होता.