पोलिसांच्या शिबिरात दिव्यांग बांधवांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST2021-05-18T04:17:14+5:302021-05-18T04:17:14+5:30
फोटो जळगाव : कोविड लसीकरणासाठी पहाटेपासून लागत असलेला रांगा नागरिकांची होणारी गर्दी तारांबळ लक्षात घेता, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे ...

पोलिसांच्या शिबिरात दिव्यांग बांधवांचे लसीकरण
फोटो
जळगाव : कोविड लसीकरणासाठी पहाटेपासून लागत असलेला रांगा नागरिकांची होणारी गर्दी तारांबळ लक्षात घेता, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पोलीस दलाच्या केंद्रावरच प्राधान्याने दिव्यांगांचे लसीकरण करून घेतले. दरम्यान, याच वेळी दिव्यांग बांधवांना मास्कचेही मोफत वितरण करण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून पोलीस मल्टीपर्पज सभागृहात सोमवारी हे लसीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रजनीकांत कोठारी, विनोद बियाणी, मुख्यालयाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप पाटील, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, भारत चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमात ५० दिव्यांग बांधवांना लस देण्यात आली. सूत्रसंचालन हेडकॉन्स्टेबल अमित माळी यांनी केले. यशस्वितेसाठी सहायक फौजदार रावसाहेब गायकवाड, कॉन्स्टेबल सतीश देसले, दीपक सुरवाडे यांनी परिश्रम घेतले. केंद्रावर ज्यावेळी लसीकरण करण्यात येईल, त्यावेळी दिव्यांग बांधवांना प्राधान्याने लस दिली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक मुंढे यांनी जाहीर केले.