लसीकरण केंद्र तीन दिवसांनी गजबजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:25+5:302021-06-26T04:13:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गेल्या तीन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाला ब्रेक लागला होता. मात्र, जिल्ह्यासाठी ...

The vaccination center will be closed in three days | लसीकरण केंद्र तीन दिवसांनी गजबजणार

लसीकरण केंद्र तीन दिवसांनी गजबजणार

लोकमत न्यूज नेटवर्क

गेल्या तीन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाला ब्रेक लागला होता. मात्र, जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे ३१ हजार ५०० डोस आल्याने यातील शहराला ४ हजार डोस मिळाल्याने शहरातील लसीकरण केंद्र शनिवारी सुरू राहणार आहे. यात महापालिकेच्या सहा व रेडक्रॉस या केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटासाठी कोविशिल्ड लस ही उपलब्ध राहणार आहे.

जिल्ह्याला सोमवारी कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाल्यानंतर त्यातील २ हजार डोस हे महापालिकेच्या केंद्रांना देण्यात आले असून २ हजार डोस हे रेडक्रॉसच्या केंद्राला देण्यात आले आहे. रोटरी येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस हा सर्व वयोगटांसाठी उपलब्ध राहणार आहे. जिल्हाभरात केवळ खासगी केंद्रांवरच शुक्रवारी लसीकरण झाले तर काही प्रमाणात उपकेंद्रांवर लस देण्यात आली. ४८ नागरिकांनी उपकेंद्र तर उर्वरित ३२३ नागरिकांनी खासगी केंद्रात लसीचा पहिला डोस घेतला.

या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण

छत्रपती शाहू नगर हॉस्पिटल, डी. बी. जैन हॉस्पिटल, शाहीर अमर शेख हॉस्पिटल, काशीबाई कोल्हे विद्यालय, पिंप्राळा मनपा शाळा, कांताई नेत्रालय, रेडक्रॉस रक्तपेढी.

या केंद्रांवर ४५ वर्षावर लसीकरण

कांताई नेत्रालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय यासह चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस हा सर्व वयोगटासाठी उपलब्ध राहणार आहे.

Web Title: The vaccination center will be closed in three days