आज सर्व केंद्रांवर लसीकरण, शहराला २५०० डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:31+5:302021-07-16T04:13:31+5:30
गुरूवारी सायंकाळी २३ हजार डोस प्राप्त झाले. त्यातील १ हजार डोस हे महापालिका तर १५०० डोस हे रोटरी ...

आज सर्व केंद्रांवर लसीकरण, शहराला २५०० डोस
गुरूवारी सायंकाळी २३ हजार डोस प्राप्त झाले. त्यातील १ हजार डोस हे महापालिका तर १५०० डोस हे रोटरी व रेडक्रॉसला देण्यात आले आहेत. गुरूवारी लस नसल्याने केंद्र बंद होते. नवी आलेल्या डोसमधून प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरण वाढणार आहे.
शहरात दोन नवे रुग्ण
जळगाव शहरात दोन नवे कोरोना बाधित आढळून आले असून ८ रुग्णांनी कोरेानावर मात केली आहे. शहरात २८ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात गुरूवारी १२ ठिकाणी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. गेल्या पंधरा ते वीस दिवसानंतर एका मृत्यूची नोंद झाली आहे. भडगाव तालुक्यातील तरूणाचा कोरोनाने चाळीसगावातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दरम्यान, जळगाव ग्रामीणमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.