लसीकरणाचा वेग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:12+5:302021-04-16T04:16:12+5:30
नातेवाईकांची गर्दी जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी वाढली आहे. डॉक्टरांच्या निवासस्थानासमोर अनेक नातेवाईक ...

लसीकरणाचा वेग वाढला
नातेवाईकांची गर्दी
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी वाढली आहे. डॉक्टरांच्या निवासस्थानासमोर अनेक नातेवाईक बसलेले असतात, तर मुख्य इमारतीसमोरही गर्दी वाढली असून, रुग्णालयात जाण्यावरून नातेवाईक व सुरक्षारक्षकांमध्ये वादही होत आहेत.
सोमवारी सभा
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे सोमवारी ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. नुकतीच सरहद समितीची सभा झाली. यात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना सदस्यांना करावा लागला होता. सोमवारी दुपारी १ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
पुन्हा तीन बाधित
जळगाव : रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जात असून सिंधी कॉलनीत अशा तपासणीत ३ बाधित आढळून आले आहेत. त्यांना कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले आहे. बुधवारी कोर्ट चौकात दोन बाधित आढळून आले होते. महापालिकेच्या पथकाकडून ही तपासणी केली जात आहे.