विद्यापीठात २०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:11+5:302021-09-24T04:20:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात फिरते लसीकरण केंद्राच्या लसीकरण शिबिरात गुरुवारी ...

Vaccination of 200 employees in the university | विद्यापीठात २०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण

विद्यापीठात २०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात फिरते लसीकरण केंद्राच्या लसीकरण शिबिरात गुरुवारी २०० कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार उपस्थित होते. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव एस. आर. भादलीकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. के. एफ. पवार, विद्यापीठ उपअभियंता आर. आय. पाटील, विद्यापीठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सांगळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुभाष पवार यांनी सूत्रसंचालन केले. लसीकरणासाठी फिरते लसीकरण केंद्राचे आरोग्यसेवक प्रशांत पाटील, सपना ननवरे, सरला सपकाळे, प्रीती निकम यांनी सहभाग घेतला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, अक्षय बागूल, बलभीम गिरी, प्रशांत पाटील, मयूर पाटील, बाळासाहेब पाटील, अरुण सपकाळे, एस. बी. पाटील, सुभाष पवार, राजू सोनवणे, महेश मानेकर, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Vaccination of 200 employees in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.