१८ ते ४४ वयोगट लसीकरणाला आता शंभर टक्के ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:39+5:302021-07-07T04:21:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरणात आता १८ ते ४४ वयोगटासाठी शंभर टक्के ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात ...

१८ ते ४४ वयोगट लसीकरणाला आता शंभर टक्के ऑनलाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरणात आता १८ ते ४४ वयोगटासाठी शंभर टक्के ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ५० टक्के ऑनलाईन व ५० टक्के ऑफलाईन अशी सुविधा होती मात्र, ते रद्द करून आता कोविशिल्डच्या पहिल्या डोससाठी सरसकट ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, कोविशिल्ड लसीचे २२ हजार ९०० डोस प्राप्त झाल्याने शहरातील सर्वच केंद्रांवर बुधवारी लसीकरण होणार आहे.
शहरातील निमयीत १८ ते ४४ वयोगटासाठी ५ केंद्र असून या पाचही केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केलेल्यानांच लस मिळणार आहे. यासह चेतनदास मेहता रुग्णालयातील केंद्रावर कोव्हॅक्सिन उपलब्ध असून त्या ठिकाणी ५० टक्के ऑनलाईन व ५० टक्के ऑफलाईन अशी सुविधा राहणार आहे. रेडक्रॉस सोसायटीच्या केंद्रावर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे.