रावेर शहरात प्रभागनिहाय लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:22+5:302021-07-14T04:20:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रावेर : शहरात प्रभागनिहाय कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने ...

रावेर शहरात प्रभागनिहाय लसीकरण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : शहरात प्रभागनिहाय कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शहर शिवसेना शाखेतर्फे शहरप्रमुख नितीन महाजन यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन यांना निवेदन दिले. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता, नगर परिषद आवारात केवळ एकच लसीकरण केंद्र असल्याने तोकड्या प्रमाणात प्राप्त झालेल्या लसीमुळे येथे प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीत कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती असल्याने नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवीत आहेत. त्याकरिता शहरात प्रभागनिहाय लसीकरण करण्यात यावे. यावेळी संतोष महाजन, नीलेश महाजन, वसीम भाई, कुणाल बागरे, समाधान महाजन, दीपक महाजन, राम शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.