उत्कर्षा विसपुते हिला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST2021-07-30T04:17:45+5:302021-07-30T04:17:45+5:30
जळगाव : एसएसबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थिनी उत्कर्षा धनंजय विसपुते हिने बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग या विद्याशाखेत प्रथम ...

उत्कर्षा विसपुते हिला सुवर्णपदक
जळगाव : एसएसबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थिनी उत्कर्षा धनंजय विसपुते हिने बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग या विद्याशाखेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नुकतेच तिला विद्यापीठाच्यावतीने सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, डॉ. संजय शेखावत, डॉ. विजय डिवरे यांच्याहस्ते तिला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
............
विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप
जळगाव : शिक्षण मंडळ सर्व शिक्षा अभियानांतर्गत मानव सेवा विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थिनी धनश्री माकोणे व विद्या भट यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. शिष्यवृत्तीचे धनादेश मुख्याध्यापिका माया अंबटकर, मुक्ता पाटील, प्रतिभा सूर्यवंशी यांच्याहस्ते देण्यात आले.
...........
विद्यार्थ्यांनी केली रोपांची लागवड
जळगाव : विद्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना कृतीयुक्त प्रकल्प देण्यात आला होता. यात विद्यार्थ्यांनी घरी गहू, ज्वारी, मूग धान्याच्या बियांचे रोपण केले. यासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक हॅरी जॉन व प्रशासिका कामिनी भट यांनी मार्गदर्शन केले.
...........
थेपडे विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
जळगाव : म्हसावद येथील थेपडे विद्यालयात दहावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. रूपेश पाटील, नूतन हुजरे, चिन्मय चौधरी या विद्यार्थ्यांचा चेअरमन डॉ. के. पी. थेपडे, मुख्याध्यापक एस.बी.सोनार, जी.डी.बच्छाव, एस.के.भंगाळे आदींच्याहस्ते गौरव करण्यात आला. शाळेतील ३७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.