नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST2021-07-10T04:12:55+5:302021-07-10T04:12:55+5:30

जळगाव : राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी १० जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार ...

Urban Development Minister Eknath Shinde in the district today | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्यात

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्यात

जळगाव : राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी १० जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. शिंदे हे शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळाहून जळगावला येतील. त्यानंतर माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे सांत्वन भेट देतील. दुपारी १२.१५ वाजता महापालिकेत भेट देणार आहे.

त्यानंतर दुपारी जळगाव येथून शिरसोली-वावडदा-सामनेर-नांद्रा मार्गे पाचोरा शहरात आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी जातील. दुपारी २ वाजता भडगाव नगरपरिषदेने नवीन बांधलेल्या शेठ बक्तावरमल चोरडिया अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा होईल. त्यानंतर भडगाव नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया लोकार्पण सोहळा दुपारी तीन वाजता बाळद रोडवर साईबाबा मंदिरात सदिच्छा भेट, दुपारी साडेतीनला पाचोरा शहरातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा. कृष्णापुरी येथील हिवरा नदीवरील पुलाचा भूमिपूजन सोहळा, दुपारी ३.४० ला पाचोरा शहरातील पांचाळेश्वर मंदिराजवळील हिवरा नदीवरील पुलाचा भूमिपूजन सोहळा. दुपारी ४ वाजता पाचोरा येथीलच माजी मंत्री के. एम. बापू पाटील व्यापारी संकुल, भाजीमंडई लोकार्पण सोहळा. दुपारी पावणे पाचला जळगावला रवाना होतील. आणि साडेपाचला पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत.

Web Title: Urban Development Minister Eknath Shinde in the district today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.